Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या वित्तीय धोरणामध्ये महिलांसाठी प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे ठेवण्यात आलेली आहे.
परंतु या योजनेसाठी नागरिकांच्या मनामध्ये अद्याप बरेच प्रश्न निर्माण आहेत जसे की या योजनेचा फॉर्म कधी भरायचा योजनेचा फॉर्म कुठे भरायचा आणि यासाठीचे पात्रता, निकष तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दलची विविध प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आहे म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल कुठे करायचा याविषयीची अधिक माहिती प्राप्त करून घेणार आहोत.
महत्त्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना सुरू
- 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार
- महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील
- एक कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता प्राप्त
- दर महिन्याला 15 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येतील
अनुक्रमणिका ↕️
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेचे स्वरूप | महिलांसाठी प्रति महिना 1500 रुपये तसेच वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडर |
मुख्य लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
योजनेची अंमलबजावणी तारीख | 1 जुलै 2024 पासून पुढे |
कोणी घोषणा केली | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत अधिवेशनात |
वयोगट | 21 ते 65 वर्ष |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
मुख्य राज्य | महाराष्ट्र |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
28 जून 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करत असताना 2024-25 च्या बजेटमध्ये महिलांसाठी प्रति महिना 1500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील महिला लाभ घेऊ शकतील त्यामध्ये 21 वर्षे वयोगट ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
महाराष्ट्रातील विवाहित, विधवा तसेच इतर महिला या योजनेचा लाभ घेतील. महाराष्ट्रातील आर्थिक स्वरूपात मागास असलेल्या महिलांसाठी या योजनेमुळे मोठा तिलासा मिळणार आहे महाराष्ट्रात सध्या रोजंदारीची टक्केवारी बघितली तर फक्त 29 टक्के महिलाच नोकरी किंवा इतर व्यवसाय करत आहेत आणि अशा परिस्थितीत महिला सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असू शकते.
अजित पवार यांनी या विषयाचे अधिक माहिती देत असताना सांगितले की महाराष्ट्र मध्ये सध्या बऱ्याच महिलांना आर्थिक स्वरूपात मदतीची आवश्यकता आहे आणि शासनाच्या माध्यमातून अशा महिलांना मदत करणे गरजेचे आहे त्यामुळेच रोख रकमेच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याबरोबरच वर्षाकाठी तीन एलपीजी सिलेंडर पण देण्यात येतील.
कोरोना कालावधीनंतर बऱ्याच व्यक्तींची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे आणि अनेक कुटुंबांनी कोरोना कालावधीत घरचा कर्ता व्यक्ती कमावल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे आणि त्यामुळे अशा महिलांना आधार देणे गरजेचे आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचे वैशिष्ट्य | Majhi ladki bahin yojana
आज देखील बऱ्याच घरांमध्ये एलपीजी सिलेंडरचा वापर केला जात नाही कारण याची रक्कम त्यांना परवडणारी नसते आणि त्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करावा लागतो परिणामी संबंधित महिलांना विविध श्वसन संबंधी तक्रारींना सामोरे जावे लागते आणि दररोज चुलीवरती स्वयंपाक करणे अवघड असते.
तसेच आज देखील बऱ्याच महिलांना विविध गरजांसाठी इतरांवरती अवलंबून रहावे लागते आणि त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी शासनामार्फत 1500 रुपये प्रति महिना देण्यात येतील आणि त्याचबरोबर महिलांना किचनमध्ये थोडासा हातभार लागावा यासाठी तीन एलपीजी सिलेंडर प्रति महिना देण्यात येतील.
यासाठी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत अन्नपूर्णा योजना नावाची योजना राबविण्यात येणार आहे आणि त्या अंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजना ही लवकरात लवकर म्हणजे जुलै महिन्यातच लागू करण्यात येईल एक जुलै ते 15 जुलै ही सध्या अर्ज करण्याची तारीख सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे आणि पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये महिलांना त्यांचा माझी लाडकी बहीण योजना चा पहिला पंधराशे रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात होईल.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये प्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल आणि आपला हा अर्ज स्वीकारल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते म्हणूनच मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना साठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया.
- सर्वात प्रथम माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल उघडावे
- त्या पोर्टलमध्ये Apply online नावाचा विकल्प आहे त्यावरती क्लिक करावे
- आता आपल्यापुढे नवीन पेज उघडेल
- नवीन पेजवरील फॉर्म मध्ये रजिस्टर करण्याचा विकल्प असेल त्यावरती क्लिक करा आणि नाव नोंदणीकृत करा
- आता लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार झाल्यानंतर लॉगिन करून अर्ज दाखल करा
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा
तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल केला की त्यानंतर ग्रामपंचायत/ सेतू कार्यालय/अंगणवाडी परिचालिका/मुख्य पर्यवेक्षिका/वार्ड अधिकारी यांच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पडताळणी होईल त्यानंतर तो अर्ज पुढे गटविकास अधिकाऱ्याकडे वर्गीत केला जाईल आणि तिथे तो अर्ज तपासला गेल्यानंतर मुख्य मंजुरीसाठी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीकडे पाठवला जाईल.
ऑनलाइन पद्धती बरोबरच आपण ऑफलाइन पद्धतीने पण अर्ज दाखल करू शकतो. त्यासाठी आपण आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा सरकारी कॅम्प तसेच सरकारने नेमून दिलेल्या ऑफिशियल सरकारी ऑफिसमध्ये जाऊन आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करू शकतो.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे आणि यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजेच अर्ज करण्यापासून ते पैसे मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून मोफत करण्यात आलेली आहे आणि जर आपण ऑफलाइन अर्ज दाखल केला तर आपल्याला त्याची रिसिप्ट किंवा इतर डिटेल प्राप्त होईल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
majhi ladki bahin yojna
1 mahina zala
status in review dakhavta.
sir kadhi approval honar sir
please sir help kara