लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई, Mumbai Municipal Corporation Beneficiary List

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.7/5 - (33 votes)

आजच्या या माहिती लेखामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबई येथील रहिवाशी असाल तर तुमच्यासाठी ही एक कामाची बातमी आहे.

कारण ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादी मध्ये आहे अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राशी बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे त्यामुळेच तुम्ही तुमची लाभार्थी यादी कशी चेक करायची याविषयीची माहिती आजच्या या लेखात देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची मुंबई येथील लाभार्थी यादी चेक करण्यासाठी आपण Mumbai Municipal Corporation Beneficiary List चा उपयोग करणार आहोत याचबरोबर आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती कशी जाणून घ्यायची हे माहित करणार आहोत.

महत्वाचे मुद्दे:

  1. Mumbai Municipal Corporation अंतर्गत लाडकी बहीण योजना यादी
  2. ऑनलाइन लाभार्थी यादी चेक करण्याची पद्धत
  3. ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी यादी कशी चेक करायची या विषयी माहिती
  4. मुंबईमधील ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुंबई

योजनामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेचे कार्यक्षेत्रमुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र
मुख्य लाभार्थी21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिला
ॲपनारीशक्ती दूत ॲप
वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Beneficiary List Mumbai

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते चेक करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे की जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता तेव्हा तुमच्याकडे मोबाईल नंबर मागितला जातो आणि त्यावरती ओटीपी पाठवला जातो आणि जेव्हा अर्ज प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा त्याच मोबाईल नंबर वरती तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही असा मेसेज पाठवण्यात येतो त्यामुळेच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती तुम्ही लाडकी बहीण योजना स्टेटस जाणून घेऊ शकतात.

Mumbai Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून लाडकी बहीण योजना ची लाभार्थी यादी चेक करणे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे. तिथे मुख्य पानावरती गेल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजना असा पर्याय शोधायचा आहे आणि त्या पर्याय वरती क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर तुमच्या विभागानुसार पीडीएफ फाईल दाखवण्यात येईल. तुमच्या विभागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव आहे का चेक करा. अशा पद्धतीने तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून लाडके बहीण योजनेचा अर्ज स्टेटस चेक करू शकता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई वेबसाईट

लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईटवरून मुंबईची लाभार्थी यादी चेक करण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट – ladki bahin maharashtra gov in उघडा. सदर वेबसाईट वरील मेनू बारमध्ये अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्यापुढे एक नविन फॉर्म उघडेल ज्यात मोबाईल नंबर आणि पासवर्ड सोबत कॅपच्या टाकून लॉगीन करा. तुम्ही लॉगिन झाल्यावर यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा. तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज उघडेल तिथे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकाल.

लाडकी बहीण योजना यादी मुंबई नारीशक्ती दूत ॲप

नारीशक्ती दूत ॲपचा वापर करून लाडकी बहीण योजना मुंबई येथील यादी बघण्यासाठी सर्वात प्रथम प्ले स्टोअरचा वापर करून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा आणि ते ओपन करा. तुमच्यापुढे मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय असेल तिथे मोबाईल नंबर टाका आणि तुमच्या मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर तिथे ओटीपी टाकून लॉगिन करा. मुख्य पानावरती तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडा. अर्जाच्या सुरुवातीलाच वरच्या बाजूला तुमच्या अर्जाची स्थिती बघता येईल आणि त्या मदतीने आपण आपला अर्ज मंजूर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे हे चेक करू शकतो.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

नाशिकपुणे
अमरावतीजळगाव
कोल्हापुरसांगली
सोलापूरइतर

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment