जर तुम्ही लाडकी बहीण योजना साठी अर्ज केलेला असेल तर आता लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपूर प्रकाशित करण्यात येत आहे आणि त्या अंतर्गत ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला नागपूर विभागाची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चेक करणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन माध्यमांचा उपयोग करू शकता आणि आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते बघू शकता. जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर ते पण तुम्हाला या माध्यमातून कळेल आणि तुम्ही तुमचे आवेदन परत पाठवू शकता.
महत्त्वाचे मुद्दे:
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नागपूर यादी प्रकाशित
- ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे त्यांना लाभ मिळणार
- ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजना यादी चेक करता येणार
- जर आपला अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्यामध्ये बदल करून परत आवेदन पाठवू शकाल
अनुक्रमणिका ↕️
माझी लाडकी बहीण योजना 2024 नागपूर
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | जुलै 2024 पासून |
अर्ज करण्याच्या शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2024 तसेच त्यापुढे निरंतर |
पहिला हप्ता | 14 ऑगस्ट 2024 |
अर्जाचे शुल्क | 0 रूपये |
अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
महत्त्वपूर्ण ॲप | नारीशक्ती दूत |
वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी Nagpur Municipal Corporation
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि जर तुमचे नाव त्या लाभार्थी यादी मध्ये आहे की नाही ते चेक करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीचा वापर करून लिस्ट चेक करू शकाल आणि पीडीएफ फाईल डाऊनलोड करून आपले नाव त्यामध्ये चेक करू शकाल. जर तुम्हाला लाभार्थी यादी पीडीएफ प्राप्त करायची असेल तर तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.
- सर्वात प्रथम Nagpur Municipal Corporation च्या अधिकारीक संकेतस्थळावरती जा
- संबंधित संकेतस्थळाचे मुख्य पान उघडा
- पेज वरती लाडकी बहीण योजना पर्याय शोधा
- त्या पर्यायावर ती क्लिक करा तुमच्यापुढे परत एक नवीन पान उघडेल
- नवीन पानावरती वॉर्ड अनुसार पीडीएफ फाईल देण्यात आलेले आहे तिथून आपल्या वॉर्ड ची फाईल डाऊनलोड करा
- डाऊनलोड केलेल्या फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव शोधा
मिळालेल्या लेटेस्ट माहितीनुसार सध्या नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अद्याप लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्ही पुढील इतर माध्यमांचा उपयोग करून लाभार्थी यादीत महिलेचे नाव आहे की नाही ते चेक करू शकाल.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Nagpur
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारमार्फत एक नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे आणि या वरती तुम्ही आपले लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झालेले आहे की नाही ते चेक करू शकाल तसेच आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊन तिथेच आपला अर्ज परत सबमिट करू शकाल. म्हणजेच तुम्हाला सर्व प्रक्रिया एकाच वेबसाईट वरती करता येईल.
यासाठी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट उघडा आणि तिथे मुख्य पानावरती अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून करायचा आहे आणि जर तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही तिथे तुमचा पासवर्ड परत बदलू पण शकाल.
लॉग इन केल्यानंतर तुमच्यापुढे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल तिथेच तुम्हाला वरच्या बाजूला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे हे चेक करता येईल.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपूर, Narishkati Doot App
जर तुम्हाला ॲपचा उपयोग करून तुमची ladki bahin yojana status जाणून घ्यायची असेल तर सर्वात आधी प्ले स्टोअर वरून नारीशक्ती ॲप डाऊनलोड करून घ्या संबंधित ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर वरील ओटीपी च्या मदतीने लॉगिन करा मुख्य पानावरती तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुमचा लाडके बहीण योजनेचा अर्ज उघडा तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे कळेल जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होईल.
लाडकी बहीण योजना ऑफलाईन यादी नागपूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील एक लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना होणार आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायती मार्फत लाडकी बहिणी योजना लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि जर तुमच्या ग्रामपंचायतीने संबंधित यादी प्रकाशित केलेले असेल तर तुम्ही तिथे लाभार्थी महिलेचे नाव चेक करू शकाल.
याचबरोबर जर ग्रामपंचायतीने यादी लावलेली नसेल तर तुम्ही जिथे ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजेच अंगणवाडी किंवा पोस्ट ऑफिस किंवा योजना कॅम्प फॉर्म भरलेला असेल तर अशा ठिकाणी भेट द्या आणि तिथे आपण आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.
लाडकी बहीण योजना पात्रता आणि अपात्रता निकष
लाडकी बहीण योजना राज्यभर राबवली जात असली तरी यामध्ये बरेच पात्रता आणि अपात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत ज्यामधून महिला अपात्र ठरत आहेत यामध्ये वेळोवेळी सरकारच्या वतीने बदल पण करण्यात आलेले आहेत तरीपण महाराष्ट्रातील काही महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात.
लाडकी बहीण योजनेसाठी आधी शेती पाच एकरापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही अशी अट ठेवण्यात आलेली होती परंतु पुढे ही अट काढून टाकण्यात आली परंतु अद्याप लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक अडीच लाख रुपये एकत्रित उत्पन्न अट ठेवण्यात आलेली आहे.
तसेच जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये परमनंट असेल किंवा आमदार, खासदार तसेच सरकारच्या इतर खात्यामध्ये महत्त्वाच्या जागेवरती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चार चाकी साधन असेल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही व त्या महिला संबंधित योजनेपासून वंचित राहू शकतील.
इतर जिल्ह्यांची लाडकी बहीण योजना यादी
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
पात्रे झाली पन पैसे आले नाही