लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड, Municipal Corporation Beneficiary List

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.4/5 - (42 votes)

नांदेड जिल्ह्यामधील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता लवकरच या योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने Nanded Municipal Corporation Beneficiary List प्रकाशित करण्यात येत आहे.

जर या यादीमध्ये महिलेचे नाव असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीत नाही त्यांना आपल्या अर्जामध्ये परत बदल करून सबमिट करावे लागणार आहे नाहीतर सदर महिला लाडकी बहीण योजना लाभापासून वंचित राहू शकते.

त्यामुळेच आजच्या लेखांमध्ये आपण आपल्या नांदेड जिल्ह्याची लाभार्थी यादी कशी बघायची आणि घरबसल्या पीडीएफ फाईल डाऊनलोड करून किंवा ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादीतील नाव कसे चेक करायचे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी प्रकाशित
  2. नांदेड जिल्ह्यातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि आता लाभार्थी यादी चेक करून शकता
  3. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने सदर लाभार्थी यादी चेक करता येईल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नांदेड Details

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
कार्यक्षेत्रनांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील पात्र महिला नागरिक
उत्पन्न मर्यादाअडीच लाखांपर्यंत
अर्ज कसा करायचाऑनलाइन किंवा ऑफलाईन
उपयुक्त ॲपनारीशक्ती दूत
वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

Naded Municipal Corporation Ladki Bahin Yojana Beneficiary List

जर तुम्ही नांदेड जिल्ह्याची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी PDF स्वरूपामध्ये शोधत असाल तर Nanded Municipal Corporation Ladki Bahin Yojana Beneficiary List डाऊनलोड करणे एकदम सोपे आहे.

यासाठी तुम्हाला सर्वात आधी नांदेड महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती जायचे आहे त्यासाठी तुम्ही Nanded Municipal Corporation टाकून सर्च करा आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा.

तिथे तुम्हाला मुख्य पानावरती आल्यावर लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचे आहे संबंधित विकल्प निवडल्यानंतर तुमच्यापुढे परत एक नवीन पेज उघडेल.

नवीन पानावरती प्रत्येक विभागानुसार लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि तेथून तुम्ही तुमच्या विभागाची यादी डाऊनलोड करायची आहे. संबंधित यादीमध्ये तुमचे नाव शोधायचे आहे आणि जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.

सध्याच्या लेटेस्ट माहितीनुसार अद्याप नांदेड महानगरपालिकेच्या वेबसाईट कडून ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु पुढील काही दिवसांमध्येच ही यादी प्रकाशित करण्यात येऊ शकते

परंतु महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती यादी प्रकाशित होईपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता आणि घरबसल्या आपले अर्ज मंजूर झालेले आहे की नाही ते बघू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने चेक केली जाऊ शकते आणि त्यामुळे शासन तसेच नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे तसेच नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये यासाठी जावे लागणार नाही.

नांदेड जिल्हा लाभार्थी यादी चेक करण्यासाठी सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा तिथे तुम्हाला मुख्य पानावरती अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगिन करा.

जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही आपला पासवर्ड बदलू शकता पासवर्ड बदलण्यासाठी फक्त मोबाईल नंबर आवश्यक आहे आणि आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येतो त्याच्या मदतीने आपण आपला password बदलू शकता आणि लॉगिन करू शकता.

लॉग इन केल्यानंतर तुमच्यापुढे लाडकी बहीण योजनेचे पोर्टल उघडलेले असेल. संबंधित पोर्टल मध्ये यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर क्लिक करा आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडा तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल.

परंतु जर तुम्ही तुमचा अर्ज नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने भरलेला असेल तर तुम्हाला संबंधित ॲपवरून लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करावे लागेल.

Ladki Bahin Yojana Yadi Nanded

नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने लाडकी बहीण योजनेची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा आणि आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर सह लॉगिन करा.

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला मुख्य पानावरती यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा तेव्हा तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल तिथे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे बघू शकता.

तसेच जर तुमचा अर्ज मंजूर किंवा रिजेक्ट झालेला असेल तेव्हा तुमच्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येतो आणि त्याच्या मदतीने पण तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

तुम्ही जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरलेला असेल तर तुम्ही जिथे अर्ज भरलेला आहे उदाहरणार्थ अंगणवाडी सेविकाकडे अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविकेला संपर्क साधावा लागेल आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यावी लागेल.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

ठाणेनागपूर
बुलढाणासातारा
अहमदनगरमुंबई

काही जास्त विचारले गेलेले प्रश्न

जर नांदेड महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पीडीएफ नसेल तर काय करायचे?

जर नांदेड महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती लाडकी बहिणी योजना यादी पीडीएफ नसेल तर तुम्ही ऑनलाईन वेब पोर्टल किंवा ॲपच्या मदतीने आपली अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता

लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून अर्जाची मुदत काय आहे?

नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजनेची सध्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 निर्धारित करण्यात आलेली आहे

लाडकी बहीण योजना अर्ज रिजेक्ट झाला तर काय करायचे?

जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला तर तुम्ही जर अर्जामध्ये एडिट बटन असेल तर एडिट करून परत अर्ज सबमिट करू शकता किंवा पहिल्यापासून नव्याने अर्ज भरावा लागेल.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

1 thought on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड, Municipal Corporation Beneficiary List”

Leave a Comment