No New Form Accepted in Ladki Bahin Yojana: बऱ्याच महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु अद्याप काही महिलांनी अर्ज भरलेला नाही आणि जेव्हा नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला जातो तेव्हा तेथे No New Form Accepted in Ladki Bahin Yojana असा मेसेज लिहून येत आहे.
त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद झाले आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहेत तसेच या पुढील कार्यप्रणाली काय असावी याविषयीची माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल तर तुम्हाला ॲप वरती फक्त अर्जाची स्थिती जाणून घेता येईल म्हणजेच तुमचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे की नाही ते आपल्याला कळेल आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर त्याचे कारण समजू शकेल.
महत्त्वाचे मुद्दे:
- नारीशक्ती दूत ॲपवरून लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सबमिट होत नाही
- नवीन अर्ज स्वीकारू शकत नाही म्हणजेच no new form accepted in ladki bahin yojana असा मेसेज फॉर्म सबमिट करताना येतो
- ज्या महिलांनी आधीच अर्ज केलेले आहेत ते अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात
अनुक्रमणिका ↕️
No New Form Accepted in Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आता लाडकी बहीण योजना वेब पोर्टलचा उपयोग करावा लागेल. म्हणजेच सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवरून अर्ज करावे लागतील.
यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा असेल तर नारीशक्ती ॲपवरून अर्ज करता येत होता परंतु आता संबंधित ॲप वरती ही सुविधा बंद करण्यात आलेली आहे आणि शासनाने निर्धारित दिलेल्या वेबसाईटवरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येत आहेत.
No New Form Accepted in Ladki Bahin Yojana – Solution
जर तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप वरती नवीन फॉर स्वीकारले जाणार नाही असा मेसेज येत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून अर्ज करावे लागतील त्यासाठी तुम्हाला सर्वात लाडकी बहीण योजनेच्या मेन वेबसाईट – ladakibahin.maharashtra.gov.in वरती जावे लागेल त्यानंतर वरच्या बाजूला अर्जदार नोंदणी नावाचा विकल्प आहे त्यावरती क्लिक करावे लागेल.
जेव्हा तुम्ही अर्जदार नोंदणी विकल्प वरती क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला लॉगिन करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर साइन अप नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे.
तुमचा नवीन अर्ज भरण्यासाठी साइन अप नावाच्या विकल्पावर ती क्लिक करा आणि तिथे परत एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरा मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि साइन अप करा.
परत लाडकी बहीण योजनेच्या मुख्य पानावरती या आणि अर्जदार नोंदणी म्हणून विकल्पावरती क्लिक करून लॉगिन करा आणि त्यानंतर सर्व डॉक्युमेंट तसेच इतर महत्त्वाची माहिती अपलोड करून तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज सबमिट करा.
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट काही वेळेस मेंटेनन्स मोड वर ठेवण्यात येत असते त्यामुळे वेबसाईट वरून पण अर्ज करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीमध्ये काय करायचे यासाठी तुम्ही पुढील लेख वाचू शकता.
हे पण वाचा: लाडकी बहीण योजनेचे ॲप आणि वेबसाईट बंद पडले, आता काय करायचे?
Majhi Ladki Bahin Yojana Website Portal
माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे ज्याची लिंक – ladki bahin.maharastra.gov.in आहे. आता कोणतेही लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला Majhi Ladki Bahin Yojana Website Portal वरूनच संबंधित फॉर्म भरावे लागतील.
याचबरोबर माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल वरती तुम्ही जर आधीच अर्ज केलेला असेल तर त्याची माहिती बघू शकता आणि तुमचा अर्ज बाद झालेला आहे की स्वीकारला गेलेला आहे हे पण बघू शकता आणि जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करून परत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.
फक्त लाडकी बहीण योजनेसाठी असलेले या पोर्टल वरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होते जसे की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेचे उद्दिष्ट, लाडकी बहीण योजना पात्रता निकष, अपात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती पण मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत म्हणूनच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस अर्ज करण्याचा प्रयत्न करा अशा वेळेस वेबसाईटवरील ट्रॅफिक कमी असते आणि आपला अर्ज सबमिट होण्याची शक्यता जास्त असते.
लाडकी बहीण योजनेचा मोबाईल ओटीपी का जात नाही?
सध्या लाडकी बहीण योजना नवीनच सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या पोर्टलमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहे तसेच बऱ्याच महिला एकाच वेळेस अर्ज भरत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा मोबाईल ओटीपी वेळेवर जात नाही.
या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी पोर्टलमध्ये बदल केले जात आहे जेणेकरून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा सुरळीतपणे लाभ घेऊ शकतील.
Ladaki Bahin Yojana Maharashtra
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील 65 वर्ष वयोगटापर्यंतच्या पात्र महिला |
फायदा | डीबीटी पद्धतीने बँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये |
योजनेची सुरुवात | जुलै 2024 पासून |
घोषणा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये |
वेबसाईट | 454ladakibahin. maharashtra.gov.in |
नवीन अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन वेबसाईटवरून |
नारीशक्ती दूत ॲप, लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद
जेव्हा लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आलेली होती तेव्हा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरायचे असतील तर त्यासाठी नारीशक्ती दूत ॲप चा उपयोग केला जात होता परंतु मागील काही दिवसांपासून या ॲपवरील अर्ज करण्याची प्रणाली बंद करण्यात आलेली आहे.
आणि त्या ऐवजी आता महाराष्ट्र शासनामार्फत एक नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे ज्या माध्यमातून तुम्ही नवीन अर्ज दाखल करू शकता आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता.
आत्तापर्यंत 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि जवळपास एक कोटी अर्जांची तपासणी करण्यात आलेली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाईल आणि त्या हप्ता चा लाभ महाराष्ट्रातील एक कोटी पेक्षा जास्त महिला घेणार आहेत.
ही योजना पहिल्यापासूनच काहीशी वादाच्या भवऱ्यात सापडली आहे आणि आता या योजनेमुळे इतर योजनांचे तसेच विकास कामांचे निधी काही काळ रोखल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इतर खात्यातील मंत्र्यांची याला काहीशी निराशा आहे. परंतु राज्य सरकार मार्फत ही योजना अत्यंत प्रभावीपणे आणि खंबीरपणे राबविण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र | लाडकी बहीण योजना हमीपत्र |
लाडकी बहीण योजना कागदपत्रे | लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी |
काही महत्त्वाच्या प्रश्न
लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा?
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही राज्य सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाईन वेब पोर्टलची मदत घेऊ शकता आणि त्या माध्यमातून अर्ज दाखल करू शकता
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद आहे, काय करायचे?
लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटवर सध्या एकाच वेळेस बऱ्याच महिलांचे अर्ज भरले जात आहेत आणि त्यामुळे वेबसाईटच्या सर्वर ला परिणाम होत असतो तसेच पोर्टल मध्ये काही बदल करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद करण्यात येते.
लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज करता येतो का?
ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही किंवा ऑनलाईन अर्ज भरत असताना काही अडचणी येत असतात अशा महिला ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस, अंगणवाडी, लाडकी बहीण योजना कॅम्पमध्ये भेट देऊ शकता.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा