जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ladki bahin maharashtra.gov.in वरूनच अर्ज दाखल करावा लागेल कारण नारीशक्ती दूत ॲप वरती आता नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत.
त्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टलची सुविधा करण्यात आलेली आहे जेणेकरून लाभार्थी महिला ऑनलाईन वेबसाईटवरून आपले अर्ज दाखल करू शकतील आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील.
याचबरोबर जर तुम्ही याआधी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला असेल तर तुम्हाला तुमची अर्ज ची स्थिती जाणून घ्यावी लागेल. म्हणजेच तुमच्या अर्जाचे स्टेटस बघण्यासाठी पण तुम्ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईटचा उपयोग करू शकता. यामध्ये तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने अर्जाची स्टेटस जाणून घेता येईल.
महत्त्वाचे मुद्दे:
- नवीन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टल ladki bahin maharashtra gov in चा उपयोग करा
- नारीशक्ती दूत ॲप वरती आता नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत त्यामुळे वेबसाईटचा वापर करावा लागेल
- फक्त आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि मात्र काही डॉक्युमेंट च्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
- जर नवीन पात्रता यादी बघायची असेल तर तुम्ही official website चा वापर करू शकाल.
अनुक्रमणिका ↕️
- Ladki Bahin Maharashtra Gov In Online 2024
- Ladki Bahin Yojana online apply maharashtra @ladkibahin.maharashtra.gov.in
- Ladki Bahin Maharashtra Gov In Online Registration Details
- Ladki Bahin Maharashtra Gov In Login Process
- Ladki Bahin Maharashtra Gov In Web Portal 2024
- Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra
Ladki Bahin Maharashtra Gov In Online 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेचे उद्दिष्ट | महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदत |
मुख्य लाभार्थी | 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला |
लाभ | प्रति महिना 1500 रुपये |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन |
पहिला हप्ता | 17 ऑगस्ट 2024 |
उपयुक्त ॲप | नारीशक्ती दूत |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana online apply maharashtra @ladkibahin.maharashtra.gov.in
लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे अत्यंत सोपे झालेले आहे आणि यासाठी आता आपण घरबसल्या अर्ज दाखल करू शकतो त्यामुळे आपल्या वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
तसेच आपल्याला सरकारी कार्यालयांमध्ये जास्त फेरफटका मारावा लागणार नाही आणि तसेच ladki bahin.maharashtra.gov.in च्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर आपण आपल्या अर्जाचे काय झाले आहे हे पण घरी बसल्याच बघू शकतो.
लाडकी बहिण योजनेची सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन वेब पोर्टल ladki bahin maharashtra.gov.in portal च्या माध्यमातून केले जाणार आहे आणि आता 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता देण्यात येणार असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाही अशा महिला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात यासाठी त्यांना गावातील अंगणवाडी सेविका किंवा इतर सरकार नेमणूक केलेल्या कार्यालयामध्ये जावे लागेल आणि तिथे आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील.
Ladki Bahin Maharashtra Gov In Online Registration Details
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या वेबसाईट वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे. त्यानंतर तिथे अर्जदार लॉगिन नावाच्या विकल्पावरती क्लिक करायचे आहे. तुमच्या पुढे एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला सर्वात खाली Doesn’t have account, Create account? नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे. तुमच्यापुढे परत एक नवीन फॉर्म उघडेल तिथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड तसेच इतर महत्त्वाची माहिती आणि पत्ता विचारला जाईल, तो भरा आणि कॅपच्या टाकून signup करा. तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाका आणि otp verify करा. तुमच्यापुढे आता परत लॉगिन पेज उघडेल तिथे मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉगिन करा.
Ladki Bahin Maharashtra Gov In Login Process
लाडकी बहीण योजनेसाठी लॉगिन करण्याकरिता तुमच्याकडे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड असणे गरजेचे आहे संबंधित माहिती असल्यानंतर तुम्ही ladki bahin maharashtra government in च्या वेबसाईटला भेट द्या आणि तिथे मुख्य पानावरती तुम्हाला मेनू बार मध्ये अर्जदार लॉगिन नावाचा एक पर्याय दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.
तीथे क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म उघडेल ज्यामध्ये मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या असे तीन रकाने आहेत. तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर लॉगिन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये लॉगिन करू शकाल.
Ladki Bahin Maharashtra Gov In Web Portal 2024
महाराष्ट्र शासनाच्या मार्फत लाडकी बहीण योजनेचे पोर्टल आता सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आलेले आहे या पोर्टल वरती कोणीही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो आणि अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अर्जाची पुढील प्रक्रिया जाणून घेऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वर लाडकी बहीण योजनेची पात्रता, अपात्रता तसेच ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्रे, उद्दिष्ट, यापूर्वीचे शासन निर्णय आणि इतर महत्त्वाची माहिती पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संबंधित पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही ही माहिती वाचू शकता.
हे पण वाचा: वेबसाईटवरून लाडकी बहीण योजना अर्ज स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस
Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra
लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती आपल्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती कळवले जाते म्हणजेच आपल्या मोबाईल वरती एसएमएस च्या स्वरूपामध्ये आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे की नंतर झाला आहे हे समजते आणि त्या नंतर जर आपला फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आपण त्यामध्ये एडिट करून परत अर्ज करू शकतो किंवा परत पहिल्यापासून नवीन अर्ज सादर करून लाडकी बहीण योजना लाभ प्राप्त करून घेऊ शकतो.
जर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम लाडकी बहीण वेब पोर्टल वरून लॉगिन करा आणि त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या विकल्पावरती क्लिक करा. तुमच्यासमोर तुमचा पूर्वी केलेला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. लाडकी बहीण योजनेचे विविध स्टेटस देण्यात आलेले आहे जसे की Approved, Approved SMS verification pending इत्यादी जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्टेटस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पुढील लेख वाचू शकता.
हे पण वाचा: लाडकी बहीण योजना अर्ज स्टेटस
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना आपले बँक खाते तपशील व्यवस्थित तपासणी गरजेचे आहे तसेच ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यात आलेले आहे अशाच बँक खात्याची माहिती आपल्याला फॉर्म भरताना द्यावी लागेल. जेणेकरून आपल्याला आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभ घेता येईल.
तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे का तसेच अर्ज करत असताना आम्ही आता कोणकोणत्या अडचणी येत आहे हे खाली कमेंट च माध्यमातून कळवा.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
Narishakti app Varun apply kela hota form form approved zala aahe 03/08/2024
aani. ajun paise nahi aale aahet
लाडकी बहीण योजना पैसे
आले नाही 16 ऑगस्ट 2024
रोजी फॉर्म भरला पैसे आले नाही
जर तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज योग्य वेळेमध्ये मंजूर झाला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये प्राप्त होतील
लाडकी बहिण योजना चा फ्रॉम approved झाला आणि आधार bank सेटिंग झालं तरी अद्यापि पैसे आले नाही
जर काही तांत्रिक बाबींमुळे तुम्हाला या महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या नसेल तर तुम्हाला पुढील महिन्यांमध्ये संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Me Vandana Rameke form Bharla aahe. pan status pending aahe. karan kadle ka? Form bhartani aadhar upload vicharle nahi. ani form application madhe aadhar upload disat nahi . kay karu. please help.
तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची शासकीय अधिकाऱ्यांमार्फत अध्यापक तपासणी झालेली नाही पुढील काही दिवसांमध्ये ही तपासणी झाल्यानंतर अर्जाचे स्टेटस बदलेल.
MI maza account Madhun nari Shakti app Madhe 10 form bharle. saglyach approved houn paisa pan ale. but Mala ajun pending to submitted dakhavtay.
online form bharlele ahe pan aprove zale nahi ajun total 24 pending ahe
ujjivan small finance Bank che account chalel ka
ladki bahin yojnecha form mi nari shakti app var bharlay ani reject alay part new form bharychay pn website var already submitted as dakhvat ahet part form kasa bhaycha
लाडकी बहीण योजना फॉर्म 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख असताना देखील त्यापूर्वीच ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची कालावधी 31 ऑगस्ट 2024 नंतर पुढे निरंतर सुरू राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकला नाही तर तुम्ही त्यानंतर अर्ज दाखल करू शकाल.
ladki bahin yojna changle aahe