लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

PM Mudra Loan Yojana: 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळवा अत्यंत सोप्या पद्धतीने

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 5/5 - (1 vote)

PM Mudra Loan: भारत देशामध्ये व्यवसाय वाढीसाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा लोन ची घोषणा केली आणि त्यामध्ये 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे लोन कमी अटी आणि शर्तींच्या माध्यमातून देण्यात येईल अशी माहिती दिली.

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा व्यवसाय मध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही मुद्रा लोन चा उपयोग करू शकता आणि त्याच्या मदतीने 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन काढू शकता यासाठी काय प्रोसेस आहे आणि कसा अर्ज करायचा याविषयीचे अधिक माहिती आजच्या या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

PM Mudra Loan Yojana संक्षिप्त माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
योजनेचा उद्देशव्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी लोन
एकूण लोन राशीपन्नास हजार ते दहा लाख
लाभार्थी नागरिकभारत देशातील पात्र नागरिक
योजनेची सुरुवात8 एप्रिल 2015
ऑफिशियल वेबसाईटhttps://www.mudra.org.in/

PM Mudra Loan Yojana 2024

भारत या देशांमध्ये असे अनेक बेरोजगार व्यक्ती आहेत ज्यांना पैशाच्या तंगी मुळे व्यवसाय सुरू करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच काही छोट्या व्यवसायिकांना आपला व्यवसाय वाढवायचा असतो परंतु आवश्यक धन नसल्यामुळे ते करता येत नाही.

PM Mudra Loan च्या मदतीने कर्जाची राशी डायरेक्ट बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाते आणि या योजनेमुळे देशातील बेरोजगारी कमी व्हावी असा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे.

आपल्या देशात बरेच व्यक्ती नौकरी न मिळाल्याने बेरोजगार बसलेले आहेत अशा व्यक्तींना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा खूपच फायदा होईल आणि या लोन च्या माध्यमातून ते आपला बिजनेस सुरू करू शकतील.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत किती लोन मिळेल

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मुख्यतः तीन विभागांमध्ये विभागण्यात आलेली आहे ज्यामध्ये शिशु, किशोर तसेच तरुण असे प्रकार करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक प्रकरणानुसार लोन राशी निर्धारित करण्यात आलेली आहे.

  1. शिशु मुद्रा लोन योजना मध्ये तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे लोन प्राप्त होऊ शकते
  2. किशोर मुद्रा लोन योजनेमध्ये तुम्हाला पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे लोन प्राप्त होईल
  3. पाच लाखाच्या पुढे लोन प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला तरुण मुद्रा लोन योजनेचा लाभ घ्यावा लागेल आणि त्याद्वारे लोन प्राप्त करावे लागेल

मुद्रा लोन योजना साठी अर्ज कसा करायचा

जर तुम्हाला मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला पुढील प्रक्रियेचा वापर करावा लागेल आणि त्याच्या मदतीने मुद्रा लोन योजनेमध्ये अर्ज दाखल करावा लागेल.

  1. सर्वात प्रथम मुद्रा लोन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा
  2. येथे तुम्हाला तरुण, शिशु आणि किशोर असे पर्याय दिसतील त्यामध्ये आपल्याला जेवढी लोणचे आवश्यक आहे त्यानुसार मुद्रा लोन प्रकार निवडा
  3. जेव्हा तुम्ही योग्य पर्याय निवडाल तेव्हा तुमच्यापुढे एक एप्लीकेशन फॉर्म उघडेल
  4. तो एप्लीकेशन फॉर्म योग्य फॉरमॅटमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा
  5. एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढा आणि त्यामधील सर्व माहिती योग्य पद्धतीने भरा
  6. फॉर्म बरोबर जोडण्यात येणारी कागदपत्रे जोडा आणि तो फॉर्म जवळच्या बँकेमध्ये सबमिट करा
  7. बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत तुमच्या फॉर्म ची तपासणी केली जाईल आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्य असेल आणि तुम्ही लोन घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला मुद्रा लोन योजनेचा लाभ देण्यात येईल

मुद्रा लोन योजनेसाठी पात्रता

जर तुम्हाला pm mudra loan या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला संबंधित योजनेचे पात्रता निकष पार पाडणे गरजेचे आहे

  • आवेदन करणार व्यक्ती हा भारत देशातील नागरिक असावा आणि त्याचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे
  • जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही बँकेचे लोन घेऊन ते बुडवलेले असेल तर तुम्हाला मुद्रा लोन योजनेचा लाभ मिळणार नाही
  • तुम्हाला ज्या व्यवसायासाठी मुद्रा लोन आवश्यक आहे त्या व्यवसायाची तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे
  • तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, व्यवसाय संबंधीचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड इत्यादी
लाडकी बहीण योजनाऑफिशियल वेबसाईट

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment