लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहीण योजना कोर्टात टिकणार का? न्यायालयाचा निर्णय जाणून घ्या

लाडकी बहीण योजना post ला 5 स्टार रेटिंग द्या

लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होत आहेत आणि लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काही व्यक्तींकडून या योजनेला विरोध केला जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील करदात्यांच्या पैशांचा योग्य उपयोग होत नाही या निकषावरती या संदर्भात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यावरती आधीच मोठा कर्जाचा डोंगर आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे त्यात अधिक भर पडेल असे त्यामध्ये म्हणण्यात आले.

महत्वाचे मुद्दे:

  • नवी मुंबईचा चार्टर्ड अकाउंटंट माध्यमातून हायकोर्ट मध्ये जनहित याचिका जाहीर
  • पैशांचा अपव्यय होत असल्याच्या कारणास्तव जनहित याचिका
  • कोर्टाकडून जनहित याचिका वरती आज सुनावणी करण्यात आली

लाडकी बहीण योजना कोर्ट निर्णय

नवी मुंबई मधील चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्या मदतीने जनहित याचिका जाहीर केली होती आणि यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे पैशाचा अपव्यय होत आहे असा आरोप केला होता.

परंतु राज्य सरकारने ही जनहित याचिका फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार पुढील लाडकी बहीण योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

लाडकी बहिण जन याचिका रद्द करताना हायकोर्टाने ही योजना राज्य सरकारची कल्याणकारी योजना आहे आणि त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे निरीक्षण नोंदविले.

लाडकी बहिण योजना बजेटमध्ये जाहीर केलेली योजना आहे आणि याला कोणीही हस्तक्षेप कसा करू शकतो असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा प्रश्न पुढे करून धोरणात्मक निर्णय याला विरोध करता येत नाही असे मत हायकोर्टाने नोंदविले.

राज्य सरकारच्या वतीने यावेळेस लाडकी बहीण योजना समाजातील दुर्बल घटकांना लक्षात ठेवून निर्माण केलेली आहे असे मत हाईकोर्टामध्ये मांडले. त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेमध्ये जे लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे.

लाडकी बहीण योजना माहिती

लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र लाडकी बहीण योजना हमीपत्र
ऑफिशियल वेबसाईटऑफिशियल ॲप
लाडकी बहीण योजना कागदपत्रेलाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment