लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4/5 - (81 votes)

Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्य मध्ये लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे शोधत असाल तर आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला या विषयाची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

लाडकी बहिण योजनेचे फॉर्म सुरु होऊन आता एक महिना झालेला आहे आणि आता बऱ्याच महिलांचे फॉर्म स्वीकारण्यात येत आहेत तसेच काही फॉर्म मध्ये तफावत असल्या तर ते फॉर्म रिजेक्ट होत आहे.

ऑगस्ट महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे जर आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर लवकरात लवकर आपल्याला यासाठी परत फॉर्म सबमिट करावा लागेल आणि त्यासाठी आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घ्यावे लागेल.

लाभार्थी यादी मध्ये नाव शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जसे की आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने लाभार्थी यादी मधील नाव शोधू शकतो आणि जर आपले नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तर आपल्याला निश्चितच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे मध्ये पुण्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची माहिती
  • Pune Municipal Corporation च्या लाडकी बहीण योजनेच्या लिस्टची माहिती
  • आपल्याला पुणे शहराची लाडकी बहीण योजनेची लिस्ट कशी डाऊनलोड करता येणार जाणून घेऊया
  • ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने पुणे जिल्ह्याची लाभार्थी यादी चेक करता येणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला पुणे शहरातून आणि पुण्यातील गावांमधून खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पुणे शहरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि लवकरच पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पंधराशे रुपये डायरेक्ट बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे.

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यामध्ये वर्गीत केला जाईल अशी माहिती शासनामार्फत देण्यात आलेली आहे आणि अद्याप बरेच महिलांच्या फॉर्मची स्थिती त्यांना माहीत नाही त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही याविषयीची साशंकता आहे आणि रक्षाबंधनाच्या महिलांना लाभ प्राप्त व्हावा यासाठी सरकारच्या वतीने 14 ऑगस्ट 2024 पासूनच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे.

त्यामुळेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे कशी बघायची आणि यासाठी Pune Municipal Corporation वेबसाईटचा उपयोग होणार आहे की नाही तसेच ॲपच्या माध्यमातून आपण यादी बघू शकतो काय याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया.

Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

आतापर्यंत बऱ्याच Municipal Corporation च्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ची यादी जाहीर करण्यात आलेली जर तुम्हाला मुनिसिपल कॉपरेशनच्या वेबसाइटवरून तुमच्या वार्डमधील लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल डाऊनलोड करायची असेल तर त्यासाठी तुम्ही पुढील स्टेप वापरू शकता.

  1. सर्वात प्रथम google वरती सर्च करा Pune Municipal Corporation
  2. तुमच्यापुढे पुण्याच्या मुनिसिपल कॉपरेशन ची वेबसाईट येईल ती वेबसाईट उघडा
  3. मुख्य पानावरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा
  4. आता प्रत्येक वार्डनुसार पीडीएफ असलेले पेज उघडेल
  5. आपल्या वार्डमधील पीडीएफ डाऊनलोड करा आणि त्यामध्ये आपले नाव आहे का चेक करा
  6. जर तुमचे नाव तुमच्या वार्डमधील पीडीएफ मध्ये आहे तर तुम्हाला लाडकी बहिण योजना चा लाभ भेटेल

परंतु आत्तापर्यंत पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला ते ऑनलाइन पद्धतीने आणि इतर पद्धतीने चेक करावे लागेल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे चेक कसे करायचे

  • सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घ्या
  • सदर ॲप उघडा आणि त्यामध्ये आपला मोबाईल नंबर तसेच ओटीपी आणि कॅपच्या टाकून लॉगिन करा
  • लॉग इन केल्यानंतर मुख्य पानावरती तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करा
  • जर तुमच्या उघडलेल्या अर्ज मध्ये Approved नाव दिसत असेल तर तुमचा लाडकी बहीन अर्ज मंजूर झालेला आहे

हे पण वाचा: फॉर्म रिजेक्ट झाला काय करायचे

Ladki Bahin Yojana Beneficiary Approved List Pune

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे बघण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट ची मदत होऊ शकते. यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in ला भेट द्यायचे आहे आणि तिथे लॉगिन करायचे आहे.

लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे मेनू बारमध्ये यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प दिसेल त्यावरती क्लिक करा आणि तिथे लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडला जाईल त्यामध्ये आपले लाभार्थी स्टेटस जाणून घ्या तसेच त्यामध्ये आपला अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे देखील समजेल.

Ladaki Bahin Yojana Pune Update

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील पात्र महिला
राज्यमहाराष्ट्र
लाभप्रति महिना 1500 रुपये
उद्दिष्टमहिला आर्थिकीकरण आणि सक्षमीकरण
ऑफिशियल वेबसाईटladaki bahin.gov.in
ऑफिशियल ॲपनारीशक्ती दूत ॲप

पुणे महानगरपालिका पुढील काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्याची शक्यता आहे परंतु आत्तापर्यंत या योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु तरीदेखील आवेदन करणाऱ्या महिला ऑनलाइन ॲप तसेच वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात आणि जर अर्जामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारू शकतात.

जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला नसेल तर तुम्ही तो लवकरात लवकर करावा कारण पुढील काही दिवसांमध्येच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे आणि त्याआधी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे म्हणून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज भरावेत.

आणि अर्ज भरत असताना सर्व माहिती, मोबाईल नंबर, डॉक्युमेंट चे फोटो तसेच इतर उपयुक्त माहिती योग्यरीत्या भरावी जेणेकरून आपण अर्ज केल्यानंतर पहिल्या वेळेसच अर्ज मंजूर होईल आणि आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीलाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र
लाडकी बहीण योजना हमीपत्रलाडकी बहीण योजना स्टेटस

महत्वाचे प्रश्न:

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट होतो का?

होय, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म विविध कारणांमुळे रिजेक्ट केला जातो. काही वेळेस परत फॉर्म एडिट करून सबमिट करता येतो तर काही वेळेस पहिल्यापासून नवीन फॉर्म भरून द्यावा लागतो.

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कोणत्या महिन्यात येईल?

लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता ऑगस्ट 2024 मध्ये देण्यात येईल जो डीबीटी पद्धतीने डायरेक्ट बँक खात्यामध्ये प्रसारित केला जाईल.

रेशन कार्डचा फोटो अपलोड करताना चुकला तर फॉर्म सबमिट होईल का?

रेशन कार्ड चा फोटो अपलोड करताना चुकला तरी पण फॉर्म सबमिट होईल परंतु फॉर्म ची चेकिंग करत असताना तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल आणि तुम्हाला परत एकदा रेशन कार्ड च्या चांगला फोटो अपलोड करावा लागेल.

पुणे महानगर पालिका वेबसाईट वर यादी कधी प्रसारित होईल?

पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती सध्या लाडकी बहीण योजनेची यादी प्रसारित करण्यात आलेली नाही परंतु पुढील काही दिवसांमध्येच संबंधित संकेतस्थळावरती यादी प्रसारित करण्यात येऊ शकते.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

4 thoughts on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | Pune Municipal Corporation Ladki Bahin Yojana List”

    • जर तुमचा अर्ज जिल्हा पातळीवरती मंजूर झालेला असेल आणि बँकेचे तपशील तसेच इतर डिटेल्स व्यवस्थित भरलेले असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

      उत्तर

Leave a Comment