मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी सातारा जिल्हा तून बऱ्याच महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सातारा प्रकाशित करण्यात आलेली आहे.
आणि ज्या महिलांचे नाव संबंधित यादीमध्ये आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे आणि जर आपले नाव लाभार्थी यादी नसेल तर आपल्याला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
जर तुम्ही आतापर्यंत आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आहे की नाही ते चेक केलेले नसेल तर तुम्ही Satara Municipal Corporation च्या ऑफिशियल वेबसाईटवरून या योजनेची लाभार्थी यादी पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी प्रकाशित
- सातारा जिल्ह्यातील लाखो महिलांचे लाडकी बहीण योजना साठी अर्ज
- अर्जावरती प्रक्रिया सुरू आणि लाभार्थी महिलांचे नाव लाभार्थी यादीत
- साताऱ्यातील ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये त्यांनाच लाभ मिळणार
अनुक्रमणिका ↕️
लाडकी बहीण योजना सातारा Municipal Corporation
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची घोषणा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत अर्थसंकल्पात |
लाभ | पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना 1500 रुपये |
मुख्य लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
ॲप | नारीशक्ती दूत |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सातारा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातारा लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही अद्याप लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते चेक केले नसेल तर ते तुम्हाला चेक करणे अत्यंत गरजेचे आहे कारण 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि त्यापूर्वी आपण आपल्या अर्जामध्ये जर अर्ज बाद झालेला असेल तर बदल करून परत सबमिट करणे आवश्यक आहे.
Step 1: सर्वात आधी सातारा महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट Satara Municipal Corporation वरती जा
Step 2: वेबसाईट उघडा आणि तेथे मुख्य पानावरती लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा
Step 3: लाडकी बहीण योजना पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल तिथे प्रत्येक वॉर्ड अनुसार लाडकी बहीण योजना पीडीएफ फाईल देण्यात आलेली आहे
Step 4: तुमच्या भागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा फाईल मध्ये आपले नाव शोधा जर तुमचे नाव लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल
परंतु सध्या प्राप्त असलेल्या लेटेस्ट माहितीनुसार सातारा महानगरपालिकेच्या वतीने अद्याप लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीत चेक करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे घरबसल्या चेक करू शकता ज्यामुळे आपली वेळ आणि पैशाची बचत होईल आणि कुठे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
Ladki bahin yojana beneficiary list Satara
वेबसाईटच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी बघणे खूपच सोपे आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप वरून पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in उघडा
- तिथे मुख्य पानावरती तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प आहे त्यावर क्लिक करा आणि लॉगिन करा
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल तेथे तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या
जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही परंतु जर तुमचा अर्ज नामंजूर झालेला असेल तर तुम्हाला परत अर्ज सबमिट करावे लागू शकतो.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सातारा, नारीशक्ती दूत
लाडकी बहीण योजनेसाठी उपयुक्त असणाऱ्या नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने आपण आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकतो आणि त्यासाठी फक्त आपल्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत ॲप असले पाहिजे.
- सर्वप्रथम नारीशक्ती दूत ॲप google वरून डाऊनलोड करून घ्या
- ॲप मध्ये मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करा
- ॲप उघडल्यानंतर तिथे होम पेज वरती यापूर्वी केलेले अर्ज विकल्पावर क्लिक करा
- तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल
- तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या
Ladki bahin yojana yadi Satara 2024
सातारा जिल्हा मधील विविध ग्रामपंचायत मार्फत लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे अद्याप सर्वच ग्रामपंचायत मार्फत यादी प्रकाशित करण्यात आलेली नसली तरी बऱ्याच ग्रामपंचायतीमार्फत ही यादी लावण्यात आलेली आहे जर तुमच्या ग्रामपंचायतीने यादी लावलेली असेल तर तुम्ही तिथे आपले नाव चेक करू शकता.
तसेच जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने आशासेविकेकडे किंवा इतर सरकारी ऑफिसमध्ये अर्ज भरला असेल तर तुम्ही संबंधित ऑफिसमध्ये जाऊन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्यात बदल करून परत अर्ज सबमिट करा.
अर्ज जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा आपल्याकडे मोबाईल नंबर मागितला जातो आणि त्यावरती ओटीपी पाठवला जातो. आपल्या याच रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती जेव्हा आपला अर्ज मंजूर किंवा रिजेक्ट केला जातो तेव्हा एसएमएस पाठवण्यात येतो जर तुमच्या मोबाईल नंबर वरती MMLBY approved नावाचा मेसेज पाठवण्यात आलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजना माहिती, सातारा
लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत करण्यात आली आणि त्यानंतर या योजनेची अत्यंत जलद गतीने यशस्वीरित्या अंमलबजावणी करत जुलै 2024 पासून अर्ज सुरू करण्यात आले ही योजना सरकारच्या पद्धतीने योग्यरित्या अंमलबजावणी होत असली तरी या योजनेवर वेळोवेळी टीका करण्यात आली आणि ही योजना वादाच्या भवऱ्यात देखील सापडली मागे काही दिवसांपूर्वी या योजनेविरुद्ध हायकोर्ट मध्ये जनहित याचिका जाहीर करण्यात आली होती की ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्सचा पैसा व्यर्थ घालत आहे परंतु हायकोर्टच्या माध्यमातून संबंधित याचिका फेटळण्यात आली आणि त्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे यापूर्वी संबंधित हप्ता 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्त वरती देण्यात येईल असे सांगण्यात येत होते. त्याच अनुषंगाने आता शासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात मंजूर केले जात आहे तसेच काही अर्ज डॉक्युमेंट किंवा माहितीच्या अभावामुळे रिजेक्ट केले जात आहेत.
इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा