लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

SBI Shishu Mudra Loan Yojana: स्वतःचा व्यवसाय सुरू करायला 50 हजार रुपयांचे लोन, शासनाची नाविन्यपूर्ण योजना

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.1/5 - (9 votes)

SBI Shishu Mudra Loan Yojana: जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यात उपयुक्त भांडवल नसेल तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आज अशा योजनेविषयी सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही पन्नास हजार रुपयांपर्यंतचे लोन प्राप्त करू शकता.

या योजना चा लाभ घेऊन महाराष्ट्रातील बऱ्याच नागरिकांनी लोन प्राप्त केलेले आहे आणि आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे स्टेट बँक शिशु लोन योजनेचा लाभ घेऊन तुम्ही कशाप्रकारे लाभ प्राप्त करू शकता याविषयीची माहिती जाणून घेऊया.

आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की या योजनेतून जर आपण लोन प्राप्त केले तर आपल्याला वर्षाला किती टक्के व्याजदर द्यावा लागू शकतो किंवा हे किती वर्षांसाठी लोन मिळू शकते तर आपल्याला एक ते पाच वर्षांसाठी शिशु मुद्रा लोन प्राप्त होऊ शकेल आणि याची वार्षिक व्याज मर्यादा 12% आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • SBI Shishu Mudra Loan Yojana अंतर्गत 50000 रुपयांपर्यंतचे लोन
  • एक ते पाच वर्ष कर्जाचा कालावधी
  • वार्षिक 12 टक्के व्याजदर
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन सुविधा

SBI Shishu Mudra Loan Yojana

भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत शिशु मुद्रा लोन प्रदान करण्यात येत आहे आणि जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर 50 हजार रुपयांपर्यंतचे लोन या माध्यमातून तुम्ही प्राप्त करू शकाल.

भारत सरकार मार्फत चालवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया शिशु मुद्रा लोन तुम्ही प्राप्त करू शकता या लोनचा मुख्य उद्देश भारतातील नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि व्यवसायाची संधी प्राप्त करून देणे.

शिशु मुद्रा लोन योजना अंतर्गत तुम्ही लोन घेतल्यानंतर साठ महिने किंवा पाच वर्षांपर्यंत या लोन ची परतफेड करावी लागेल म्हणजेच या लोन चा मुख्य उपयोग छोट्या स्वरूपातील व्यवसाय सुरू करण्यासाठी होईल आणि आपला व्यवसाय व्यवस्थित चालायला लागल्यावर आपण सुरळीतपणे कर्जाची परतफेड करू शकाल.

SBI Shishu Mudra Loan Yojana 2024 पात्रता निकष

  • अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असावा
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असावे
  • अर्जदाराकडे आवश्यक दस्तावेज असावेत
  • अर्जदाराने यापूर्वी कर्ज घेऊन ते बुडवलेले नसावे
  • बँकेच्या नियमांमध्ये अर्जदार पात्र असावा

एसबीआय शिशु मुद्रा लोन योजना मुख्य फायदे

भारत देशातील ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा व्यवसायासाठी एसबीआय शिशु मुद्रा लोन एक महत्त्वाचे कार्य करेल कारण जे नवीन व्यावसायिक व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना कोणत्याही गॅरंटी विना 50 हजार रुपयांपर्यंतचे लोन प्राप्त होऊ शकते.

भारतातील कोणताही पात्र नागरिक या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतो आणि एसबीआय बरोबरच वेगवेगळ्या भारतातील बँकांमधून या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

SBI Shishu Mudra Loan Yojana Documents

  • रहिवास दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसाय संबंधित पुरावे
  • बँक खात्याचे विवरण
  • मोबाईल नंबर, इत्यादी

SBI Shishu Mudra Loan Yojana Application Process

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिशु मुद्रा लोन प्राप्त करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे आणि तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पुढील स्टेप चा वापर करून शिशु मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळेच शिशु मुद्रा लोन प्राप्त करण्यासाठी पुढील स्टेप चा अवलंब करा.

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिशु मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जायचे आहे
  • तिथे तुम्हाला संबंधित ऑफिसर सोबत शिशु मुद्रा लोन विषयी चर्चा करायचे आहे आणि त्याचा एप्लीकेशन फॉर्म घ्यायचा आहे
  • फॉर्म मधील सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरा
  • फॉर्म सोबत आवश्यक असलेले डॉक्युमेंट फॉर्म ला जोडा
  • फॉर्म सोबत आवश्यक डॉक्युमेंट जोडा आणि तो फॉर्म बँकेमध्ये जमा करा
  • पुढे तुमच्या फॉर्मची पडताळणी केली जाईल
  • तुमच्या फॉर्ममधील सर्व माहिती व्यवस्थित असेल आणि तुम्ही लोन घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला एसबीआय शिशु मुद्रा लोन प्राप्त होईल

वरील पद्धतीचा वापर करून तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुद्रा लोन प्राप्त करू शकाल आणि त्याद्वारे आपल्या व्यवसायाची नवीन सुरुवात करू शकाल.

हे पण वाचा: लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment