सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी सोलापूर प्रकाशित करण्यात येत आहे आणि ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादी मध्ये आहे अशाच महिलांना लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्र मधून खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जवळपास एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे.
या अर्जाची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आत्ता पण बऱ्याच महिला ऑनलाईन अर्ज करत आहे परंतु त्याआधीच 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्याचे घोषित करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे.
म्हणूनच लाडकी बहिणी योजना अर्जांची पडताळणी खूपच जलद गतीने होत आहे आणि लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे. आपण आजच्या लेखांमध्ये solapur municipal corporation ladki bahin yojana लिस्ट कशी चेक करायची याची माहिती जाणून घेणार आहोत.
महत्त्वाचे मुद्दे:
- सोलापूर जिल्ह्यातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला
- अर्जाची पडताळणी सुरू आणि त्यानुसार लाभार्थी यादी प्रकाशित
- सोलापूर जिल्ह्यातील ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीत त्यांनाच लाभ मिळणार
- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लाडकी बहीण योजना यादी
अनुक्रमणिका ↕️
Solapur Municipal Corporation Ladki Bahin Yojana 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना |
योजनेचे कार्यक्षेत्र | संपूर्ण महाराष्ट्र |
मुख्य लाभार्थी | 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिला |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन तसेच ऑफलाइन |
ॲप | नारीशक्ती दूत |
वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापूर
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना एक रजिस्टर मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि त्यावर ते आपला ओटीपी येत असतो. जेव्हा आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर केला जातो तेव्हा त्याच नंबर वरती एसएमएस पाठवण्यात येतो की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही जर अर्ज मंजूर झालेला असेल तर Approved नावाचा मेसेज पाठवण्यात येतो आणि जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर Rejected नावाचा मेसेज पाठवण्यात येतो.
परंतु काही कारणास्तव जर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस पडला नाही तर तुम्ही Solapur Municipal Corporation च्या वेबसाईट वरून पण लाडकी बहीण योजना स्टेटस जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस वापरावे लागेल.
- सर्वात प्रथम सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा
- वेबसाईटचे मुख्य पेज उघडा
- तिथे लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा
- तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल ज्यावरती प्रत्येक वार्डनुसार वॉर्ड च्या समोर पीडीएफ फाईल दिलेली असेल
- आपल्या वार्डची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा
- संबंधित फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव शोधा
- जर फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव असेल तर लाभार्थी महिलेचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे
आत्ता चेक केलेल्या माहितीनुसार अद्याप सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु पुढील काही दिवसांमध्येच ही यादी प्रकाशित केली जाऊ शकते आणि तेव्हा तुम्ही वरील स्टेप चा वापर करून तुमच्या भागातील पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता आणि लाभार्थी यादी चेक करू शकता.
तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी चेक करू शकता आणि त्यासाठी तुम्ही नारीशक्ती दूत ॲपचा वापर करू शकता त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन वेब पोर्टलचा पण वापर करू शकता.
Solapur District Ladki Bahin Yojana List – Narishakti Doot
सोलापूर जिल्ह्यासाठी लाडकी बहीण योजनेची यादी चेक करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरील नारीशक्ती दूत ॲप चा वापर करू शकता. यासाठी सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा आणि ते उघडा तिथे मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर वरील ओटीपी तसेच कॅपच्या टाकून लॉगिन करा. तुमच्यापुढे नारीशक्ती दूत ॲप चे मुख्य पान उघडेल जिथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि आता तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल तिथे वरच्या बाजूला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की बाद हे बघू शकता.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Solapur District – Website
जर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी, सोलापूर ऑनलाइन चेक करायचे असेल तर सध्या वेबसाईटवरून हे चेक करणे खूपच सोपे झालेले आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडायची आहे.
त्यानंतर तिथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड तसेच कॅप्चा टाकून लॉगिन करायचे आहे आणि त्यानंतर नारीशक्ती ॲप प्रमाणेच या वेबसाईट वरती पण तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे.
तिथून तुम्ही तुमच्या अर्जाकडे स्थलांतरित केले जाल. तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही उघडलेल्या पेजवरती बघू शकाल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की बाद झाला आहे हे चेक करू शकाल.
तसेच जर तुमचा अर्ज नामंजूर झालेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये बदल करून किंवा परत अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी लवकरात लवकर लाभार्थी यादी चेक करणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्हा लाडकी बहिण योजना यादी
सोलापूर जिल्ह्याची लाडकी बहीण योजना यादी बघण्याची याव्यतिरिक्त पण अनेक पद्धती आहेत जसे की तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेची यादी चेक करू शकता महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामपंचायतीमार्फत लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच तुम्ही जेथे अर्ज भरला आहे अशा सरकारी ऑफिस मध्ये जाऊन पण तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकता लाडकी बहीण योजना अर्ज करताना तो अर्ज कोणी केलेला आहे हा पर्याय विचारला जातो आणि जर तुमचा अर्ज उदाहरणार्थ अंगणवाडी सेविकेने भरलेला असेल तर तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविकेकडे जाऊन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यावी लागेल.
लाडकी बहीण योजना इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
yadi solapur ladki bahin yojana