सध्या लाडकी बहीण योजना यादी प्रसारित करण्यात येत आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे जाहीर करण्यात येत आहे. जर तुमचे नाव संबंधित यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेला ठाणे तसेच आसपासच्या परिसरामधून खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि लक्षावधी महिलांनी यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत.
सध्या अर्जांची पडताळणी युद्ध स्तरावरती सुरू आहे आणि लाखो महिलांचे अर्ज चेक करून त्यांच्या अर्जाची स्थिती बदलण्यात येत आहे म्हणजेच काही महिलांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत तर काही महिलांचे अर्ज मंजूर केले जात आहेत.
आपल्या ठाणे जिल्ह्यातील ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत अशा महिलांना परत अर्ज एडिट करून भरावा लागेल किंवा नवीन अर्ज सादर करावा लागू शकतो. तसेच मंजूर लाभार्थी यादीतील महिलांना लाडकी बहीण योजना लाभ मिळेल.
महत्त्वाचे मुद्दे:
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे प्रसारित
- ज्या महिलांचे नाव ठाणे लाभार्थी यादीमध्ये त्यांना लाभ मिळणार
- आपले नाव यादीमध्ये आहे की नाही ते चेक करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने बघता येईल
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठाणे 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
पात्र लाभार्थी | महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिला |
प्रत्यक्ष लाभ | प्रति महिना पंधराशे रुपये |
योजनेचे उद्देश | महिला आर्थिकीकरण आणि स्वावलंबीकरण |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
आवश्यक ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | Thane District Municipal Corporation
जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे बघायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटची मदत घेता येईल ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती लवकरच लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि तिथून तुम्ही तुमच्या विभागाची यादी डाऊनलोड करून लाभार्थी यादीमध्ये नाव चेक करू शकाल.
त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे आणि तिथे मुख्य पानावरती जाऊन तुम्हाला लाडकी बहीण योजना असे ऑप्शन शोधायचे आहे आणि त्यावरती क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल आणि तिथे प्रत्येक विभागा नुसार लाभार्थी यादी पीडीएफ स्वरूपामध्ये देण्यात आलेले आहे तिथून तुमच्या विभागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे का ते चेक करा जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.
सध्या प्राप्त माहितीनुसार अद्याप ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु पुढील काही दिवसांमध्ये संबंधित यादी प्रकाशित करण्यात येऊ शकते.
त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ही यादी चेक करू शकता. ऑनलाइन पद्धतीने चेक केल्यामुळे तुम्हाला मोबाईल वरतीच तुमच्या फॉर्म ची स्थिती समजणार आहे
Thane Municipal Corporation Ladki Bahin Yojana List 2024
ऑनलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची यादी बघण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. तिथे अर्जदार लॉगिन नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगिन करा जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर Forgot Password बटनावरती क्लिक करा आणि आपला मोबाईल नंबर टाका त्यावरती ओटीपी पाठवण्यात येईल त्या ओटीपी च्या मदतीने आपला पासवर्ड बदला आणि नवीन पासवर्ड सह लॉगिन करा.
लाडकी बहीण योजना पोर्टल वरती लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये वरच्या बाजूला तुमच्या अर्जाची स्थिती सांगण्यात आलेली आहे.
याचबरोबर जर तुम्हाला ॲपच्या मदतीने लाडकी बहीण योजनेची यादी बघायची असेल तर त्यासाठी तुम्ही नारीशक्ती दूत ॲप चा उपयोग करू शकता. नारीशक्ती यांच्या मदतीने लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला पुढील पद्धतीचा वापर करावा लागेल.
Thane Municipal Corporation Ladki Bahin Yojana List, Narishakti Doot
नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने सुरुवातीला अर्ज मागविण्यात येत होते आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी या ॲपच्या मदतीने अर्ज सादर केलेले आहेत परंतु आता अलीकडच्या काळामध्ये योजनेचे ऑफिशियल पोर्टल सुरू झाल्यापासून नारीशक्ती दूत ॲप वरून अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.
परंतु जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची यादी बघायची असेल तर तुम्हाला प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि त्यामध्ये लॉगिन करून मुख्य पानावरील यापूर्वी केलेले अर्ज विकल्पावर क्लिक करून आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडावा लागेल तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे, ऑफलाईन
जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सरकारी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित सरकारी कार्यालयामध्येच जावे लागेल. कारण लाडकी बहीण योजना अर्ज भरत असताना तिथे तो अर्ज कोण भरत आहे असा पर्याय विचारला जातो आणि त्यानुसार संबंधित व्यक्ती जर सरकारी कार्यालय मधील असेल तर तो तिथेच ऑफिस क्रमांक टाकून आपला अर्ज भरत असतो.
जर तुम्ही तुमचा अर्ज कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये किंवा अंगणवाडी तसेच लाडकी बहीण योजना कॅम्पमध्ये भरलेला असेल तर संबंधित विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता आणि जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तसेच जर अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर संबंधित कार्यालयामधूनच आपला अर्ज परत सबमिट करा.
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर किंवा रिजेक्ट केला जातो तेव्हा तुमचा फॉर्म भरत असताना दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जातो आणि नंतर फॉर्म रिजेक्ट किंवा मंजूर झाल्यावर त्यावरती एसएमएस पाठवण्यात येतो.
महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायत तसेच नगरपालिका मार्फत लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि जर तुमचे नाव संबंधित यादीमध्ये आलेले असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होऊ शकतो त्यामुळे जर तुमच्या ग्रामपंचायतीने अशी यादी प्रकाशित केलेली असेल तर तुम्ही त्या यादीचा लाभ घेऊ शकाल.
इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
ठाणे जिल्हा बरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने फॉर्म केले आहेत जर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चेक करायची असेल तर तुम्ही पुढील जिल्ह्यांची यादी बघू शकता.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
माझे व माझा आई चे पैसे sep पर्यंत चे पैसे बँक मधे जमा झाले आहेत तेव्हा माझा सगळ्यां एक च सांगणं आहे की सर्वांना पैसे येतील घाबरु नका आपले साहेब आपल्याला कधी धोका देणार नाहीत… थोडा उशीर होत असेल प्रोसेस ला