लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Yavatmal Municipal Corporation List: लाडकी बहिण योजना यादी यवतमाळ

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.1/5 - (36 votes)

यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना खूपच फेमस झालेली आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे.

परंतु आता अर्ज लाडकी बहीण योजना मंजूर तसेच रिजेक्ट होत आहेत आणि बऱ्याच महिलांनी अजून त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेतलेली नाही. त्यामुळेच जर तुम्ही आतापर्यंत तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे हे बघितलेले नसेल तर तुम्ही ते ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या बघू शकता आणि लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते चेक करू शकता.

तसेच जर आपले नाव नसेल तर आपण परत या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी आपला अर्ज एडिट करून पाठवू शकतो परंतु त्यासाठी आपल्याकडे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिलांचा सहभाग
  • यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्रियांकडून मोठ्या संख्येने फॉर्म भरले गेले
  • पात्रता यादी लागण्यास सुरुवात ज्या महिलांचे नाव असेल त्यांना लाभ
  • अर्ज रिजेक्ट झाला तर परत एडिट करण्याची सुविधा

Yavatmal Municipal CorporationYavatmal Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांच्या वतीने लाडकी बहीण योजनेची लिस्ट प्रसारित करण्यात येत आहे आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.

  1. यवतमाळ महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा त्यासाठी Yavatmal Municipal Corporation सर्च करा
  2. मुख्य ऑफिशियल वेबसाईट उघडा आणि होम पेज वरती जा
  3. लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा
  4. पर्यायावर क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल
  5. उघडलेल्या पेजवर विभागानुसार पीडीएफ फाईल असेल आपल्या भागाची पीडीएफ डाऊनलोड करा
  6. पीडीएफ मध्ये लाभार्थी महिलेचे नाव चेक करा

महाराष्ट्र मधील महानगरपालिकांच्या वतीने लाडके बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु अद्याप यवतमाळ महानगरपालिकेच्या वतीने ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही.

पुढील काही दिवसांमध्येच यवतमाळ महानगरपालिकेच्या वतीने ही यादी प्रकाशित करण्यात येईल तेव्हा तुम्ही वरील स्टेप चा वापर करून लाभार्थी यादी मध्ये नाव चेक करू शकाल.

परंतु सध्या तातडीने लाभार्थी यादीत नाव आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. ऑनलाइन पद्धतीमध्ये आपल्या आणि शासनाच्या वेळ आणि पैशांची बचत होईल तसेच आपल्याला कुठेही न जाता घर बसल्या सदर महिलेच्या अर्जाची स्थिती जाणता येईल.

लाडकी बहिण योजना यादी यवतमाळ

  1. सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडा – ladkibahin.maharashtra.gov.in
  2. मुख्य पानावरील अर्जदार लॉगिन नावावर क्लिक करा
  3. एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  4. यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर क्लिक करा
  5. आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल
  6. अर्जाच्या वरील बाजूस अर्जाची स्थिती देण्यात आलेली आहे तिथे अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे ते चेक करा

लाडकी बहीण योजनेचे पोर्टल हे लाडकी बहीण योजनेविषयी माहिती सांगण्यास करिता आणि नागरिकांना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता तसेच इतर सर्व माहिती करता शासनामार्फत बनवण्यात आलेले आहे. या वेबसाईट पोर्टल वरती लाडकी बहीण योजनेचे विविध माहिती देण्यात येते तसेच नवनवीन अपडेट प्रसारित करण्यात येतात.

Ladki Bahin Yojana Beneficiary List Yavatmal

आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस स्वरूपामध्ये माहिती पाठवण्यात येते या एसएमएस मध्ये आपल्याला MMLBY च्या वतीने एसएमएस पाठवण्यात आलेला आहे असे कळते आणि तिथे आपला अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे समजते.

सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी ऑफलाइन पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलेला होता आणि त्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि इतर फॉर्म भरणाऱ्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्म देण्यात येणार होते जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला संबंधित फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला भेटायचे आहे आणि आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची आहे.

अमरावती विभाग इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

अमरावतीअकोला
वाशिमयवतमाळ
बुलढाणाइतर जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

1 thought on “Yavatmal Municipal Corporation List: लाडकी बहिण योजना यादी यवतमाळ”

Leave a Comment