लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता मिळण्यास सुरुवात, 2100 की 1500 रुपये मिळाले कसे चेक करायचे

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 2.5/5 - (10 votes)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 24 जानेवारी 2025 पासून हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे.

जर तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत हा हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे कारण यामध्ये आम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे याबरोबर या महिन्यात किती रुपयांचा हप्ता मिळणार आहे याची माहिती दिलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिला आणि बाल विकास मंत्रालयासाठी 3700 कोटी रुपये देण्यात आले होते आणि 26 जानेवारी 2025 पूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जातील असे सांगण्यात आले होते

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्गीत करण्यात येत आहे आणि ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाहीत अशा महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

जर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आले तर बँकेकडून त्याचा एसएमएस पाठवण्यात येतो परंतु जर काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे किंवा इतर बाबींमुळे तुमच्या मोबाईल वरती मेसेज आला नाही तर तुम्ही 27 जानेवारी नंतर बँकेमध्ये जाऊन खात्याचे तपशील तपासू शकतात.

तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँकेच्या स्टेटमेंट जाणून घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही हे कळू शकेल.

जानेवारी महिन्यात 2100 की 1500 रुपये

जानेवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट मध्ये पंधराशे रुपये पाठवण्यात आलेले आहेत म्हणजेच 2100 रुपये मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे.

मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयीची तरतूद करण्यात येऊ शकते आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येऊ शकतात.

महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ करणार असल्याचे सरकारचे धोरण आहे हे यापूर्वीच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी नमूद केले होते परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

निकषात न बसणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि त्यासाठी महिलांनी स्वतःहून आपली नावे कमी करावीत असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे तसेच अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि त्यामध्ये अपात्र असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येईल.

नवीन अर्ज कसे करायचे

लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे यासाठीचे अर्ज दाखल करता येतील. महाराष्ट्र राज्यातील महिला तसेच मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजना सुरळीतपणे पार पाडावी यासाठी राज्य शासनाकडून या योजनेमध्ये वेळोवेळी महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत आणि राज्यातील जास्तीत जास्त निकषात बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment