MMLBY Ajit Pawar: अपात्र महिलांनी लाभ घेतला त्यांचे काय होणार? 2100 रुपये कधी मिळणार

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.5/5 - (27 votes)

सन 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील करोडो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झाला परंतु ही योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेले असताना काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला आहे.

लाडकी बहीण योजना अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात आणि यामध्ये नंतर वाढ करून 2100 रुपये देण्यात येईल अशी घोषणा सरकार मार्फत करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र राज्याच्या 2025 अर्थसंकल्पामध्ये याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे पुढील काळात महिलांना पंधराशे रुपये लाभ प्राप्त होईल.

पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य केले आणि त्यामध्ये गरीब महिलांसाठी सुरू असलेली ही योजना पुढे अविरत सुरू राहील अशी माहिती दिली.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. राज्यातील करोडो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ
  2. राज्यातील गरीब घटकातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना
  3. हजारो अपात्र महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

अनुक्रमणिका ↕️

MMLBY Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडके बहीण योजनेमध्ये काही बदल करून याचा लाभ फक्त राज्यातील गरजू महिलांनाच मिळेल यासाठी तरतूद करणार असल्याची माहिती दिली.

ज्या अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून परत पैसे मागे घेतले जाणार नाहीत परंतु त्यांना पुढील काळामध्ये बदल करून योजनेतून काढण्यात येईल असे प्रतिपादन त्यांनी केले.

लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या लगेचच 2100 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात येणार नाही परंतु सध्या सुरू असलेली लाडकी बहीण योजना पुढील कालावधीमध्ये असेच सुरू राहील याबद्दल त्यांनी माहिती दिली

अजित पवार यांनी पुढे माहिती देताना सांगितले की कोणत्याही सरकारच्या सर्वच योजनांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात आणि ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या योजना बंद कराव्या लागतात म्हणजेच करोना काळात काही योजना सवलती सुरू झाल्या होत्या आणि आता त्या योजना बंद कराव्या लागल्यात

मात्र समाजाच्या हिताचा संपूर्ण विचार करून ज्या योजना समाजहितासाठी उपयोगी आहेत अशा योजना पुढील कालावधीमध्ये योग्य स्वरूपात सुरू असतील आणि त्याचा लाभ राज्यातील सर्व घटकातील नागरिकांना मिळेल.

लाडकी बहीण योजना

लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे ज्यामध्ये 18 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना लाभ दिला जातो.

ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे याच बरोबर इतर काही अटी आणि शर्ती पूर्ण करणे गरजेचे ठरते.

सुरुवातीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आवेदन करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत होता जसे की वेबसाईट, ऑफलाइन पद्धत इत्यादी. परंतु सध्या लाडकी बहीण योजनेतील सर्व गैरव्यवहार रोखण्यासाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

ऑफिशियल वेबसाईटलाभार्थी यादी
ऑफलाइन फॉर्मSelf declaration

Leave a Comment