लाडकी बहीण योजना बंद, सरकारनं निधी रोखला आणि नवीन अर्ज स्वीकारणे बंद ladki bahin yojana stopped

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.5/5 - (22 votes)

जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणे बाकी राहिले असेल तर ladki bahin yojana stopped करण्यात आलेली आहे पुढील काही काळ तुम्हाला या योजनेचा अर्ज भरता येणार नाही.

महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिण योजना एक प्रचलित योजना आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 वाटप करण्यात आलेले आहे.

परंतु आता लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज स्वीकारणे बंद झालेले आहे म्हणजेच तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला आता अर्ज करता येणार नाही. यापूर्वी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 15 ऑक्टोबर 2024 ची मुदतवाढ करून देण्यात आलेली होती.

महत्त्वाचे मुद्दे:

  • Ladki Bahin Yojana Stopped करण्यात आली आहे
  • नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत
  • सरकारने लाडकी बहीण योजनेचा निधी रोखला
  • पुढील काही काळ लाडकी बहीण योजना कार्यरत राहणार नाही

Ladki Bahin Yojana 2024 संक्षिप्त माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभवर्षाला 18000 रुपये
लाभार्थी21 ते 65 वयोगटातील पात्र महिला
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन अंगणवाडी सेविकाकडे
आत्तापर्यंत एकूण हफ्ते5
ऑफिशियल वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Stopped

महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमी वरती राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना काही काळाकरीता बंद करण्यात आलेली आहे. ladki bahin yojana stopped केल्यानंतर आता पुढील निधीचे वाटप किंवा नवीन लाभार्थी निवड करता येणार नाही.

महाराष्ट्र राज्य मध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू करण्यात आलेले आहे आणि या कालावधीमध्ये कोणत्याही नवीन योजना, भूमिपूजन किंवा मतदाराला प्रभावित करेल असे उपक्रम राबवता येणार नाहीत.

निवडणूक आयोगाकडून राज्य शासनाला अशा सर्व योजना बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ज्या योजनांमध्ये आर्थिक लाभ देण्यात येतो आणि त्यामध्येच आदिती तटकरे यांच्या विभागाअंतर्गत चालू असणारी लाडकी बहीण योजना काही काळ बंद करण्याचे आणि या योजनेचे निधी रोखण्याचे राज्य शासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील निवडणुकांचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम ज्यांनी राज्य शासनाच्या सर्व विभागाकडून अशा योजनेची माहिती घेतली ज्या योजनांमध्ये रोख स्वरूपात आर्थिक लाभ देण्यात येतो किंवा मतदारांना प्रभावित करता येऊ शकेल.

राज्य शासनाने निवडणूक आयोगाला याविषयीची माहिती देताना सांगितले की लाडकी बहिणी योजनेचा निधी 15 ऑक्टोबर 2024 पासून रोखण्यात आलेला आहे आणि आता येत्या कालावधीमध्ये निवडणुका होईपर्यंत नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा लाभार्थी महिलांना कोणताही लाभ देण्यात येणार नाही.

Ladki bahin yojana November installment

लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता यापूर्वीच देण्यात आलेला आहे आणि जर तुम्हाला आतापर्यंत हा लाभ प्राप्त झालेला नसेल तर तुम्हाला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

आता निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचे उर्वरित हप्ते आणि निधी वितरित करण्यात येणार आहे राज्यांमधील दोन कोटी 44 लाख महिला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी प्राप्त होत्या आणि त्यामध्ये 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ देण्यात आलेला आहे.

राज्यांमध्ये दहा लाख महिलांना अद्याप लाभ प्राप्त झालेला नाही आणि आता त्यांना पुढील कालावधीमध्ये लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर परत योजना पूर्वरत करण्यात येऊ शकते आणि त्यामध्ये सर्व लाभार्थी महिलांना लाभ प्राप्त होईल.

ladki bahin yojana stopped करण्यात आलेले आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या योजनेचे सर्व निधी रोखण्यात आलेले आहेत तसेच नवीन अर्ज पण स्वीकारण्यात येणार नाहीत त्यामुळे या योजने संदर्भात कोणत्याही अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये.

Leave a Comment