Ladki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी ladkibahin maharstra.gov.in वर प्रकाशित करण्यात येत आहे आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजना यादी महाराष्ट्र राज्य शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
या लेखामध्ये आपण ladki bahin yojana list कशाप्रकारे चेक करायची याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करणार आहोत.
महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच जुलै महिन्यापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली परंतु यामध्ये नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वर प्रॉब्लेम मुळे बरेच फॉर्म भरण्यास विलंब होत आहे आणि अडचणी निर्माण होत आहेत.
काही नागरिकांची अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू आहे तर काही लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकार करून अप्रूव्ह करण्यात आलेले आहे आणि काही महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी अत्यंत जलद गतीने होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे बऱ्याच वेळेस काम करत नाही आणि त्यामुळे होणाऱ्या गैरसोय लक्षात घेता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ladaki bahin maharashtra.gov.in जाहीर करण्यात आलेले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आलेली आहे
- ज्या महिलांचे नाव त्या ladki bahin yojana list यादीमध्ये आहे अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे
- ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येईल
- लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज स्वीकारत असताना प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रक्रिया करून अर्ज बाद तसेच मंजूर करण्यात येत आहेत
- Ladki Bahin Yojana List मध्ये पात्र लाभार्थी महिलांची नावे देण्यात येत आहे
अनुक्रमणिका ↕️
- लाडकी बहीण योजनेची माहिती @Ladki Bahin Maharashtra Gov In
- Ladki Bahin Yojana List 2024 @ladakibahin.maharashtra.gov.in
- Ladki bahin maharashtra gov in 2024 online list
- Ladki bahin yojana offline list PDF
- Ladki Bahin Yojana Form Status: Ladki Bahin Yojana list Maharashtra
- ladki bahin maharashtra.gov.in 2024
- Ladki bahin yojana Form Rejected reason in Marathi
लाडकी बहीण योजनेची माहिती @Ladki Bahin Maharashtra Gov In

योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या महाराष्ट्रातील महिला |
लाडकी बहीण योजना यादी चेक करण्याची पद्धत | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची मुदत | 15 ऑक्टोबर, 2024 |
लाभ | 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये |
ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana List 2024 @ladakibahin.maharashtra.gov.in
लाडकी बहीण योजना लिस्ट व्यवस्थित पद्धतीने चेक करता यावी आणि प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे लाभार्थी स्टेटस जाणून घेता यावे यासाठी सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत लाभार्थी आपले नाव ladki bahin yojana list 2024 मध्ये आलेले आहे की नाही ते चेक करू शकतात आणि जर आपला अर्ज बाद झालेला असेल तर तिथे परत अर्ज दाखल करू शकता.
- लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट उघडा – ladakibahin.maharashtra.gov.in
- मुख्य पानावर जा
- अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा आणि मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगिन करा
- लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड उघडेल
- यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर जा
- तिथे Approved मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे
- पुढे उजव्या बाजूला डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करा
- पेज स्क्रोल करत खाली या
- खाली आपला अर्ज बाद झालेला असेल तर त्याचे कारण आणि कोणत्या पातळीवर अर्ज बाद झालेला आहे ते कळेल
- बाद झालेला अर्ज परत पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक करून एडिट करा आणि सबमिट करा
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज Approved म्हणजेच मंजूर असणे गरजेचे आहे आणि आपण आपले नाव लाभार्थी यादीमध्ये चेक करण्यासाठी ladki bahin yojana list च्या इतर माध्यमांचा उपयोग करू शकतो ज्यांची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.
Note: शासनाच्या नवीन नियमांनुसार सामान्य नागरिकांना लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे जर तुम्ही अंगणवाडी सेवकांमार्फत फॉर्म भरला असेल तर कदाचित तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी स्टेटस चेक करता येणार नाही.
Ladki bahin maharashtra gov in 2024 online list
ज्या महिलांनी ऑनलाईन पद्धतीने नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेले आहेत अशा महिला संबंधित ॲपच्या माध्यमातून आपले अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकतात. जर तुम्ही नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेला असेल तर तुम्ही पुढील पद्धतीने तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते चेक करा.
- सर्वात प्रथम नारीशक्ती दूत ॲप उघडा आणि आपला मोबाईल नंबर टाकून नंतर ओटीपी टाकून लॉग इन करा
- होमपेज वरती तुम्हाला केलेले अर्ज नावाचा विकल्प दिसेल त्यावर ती क्लिक करा
- तुम्ही सादर केलेल्या अर्जाची माहिती तुमच्या समोर सादर होईल
- जर तुमचे एसएमएस व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असेल आणि अर्ज व्यवस्थित भरलेला असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : Approved असा मेसेज वरती दिसेल
- तसेच मंजूर झालेल्या अर्जांमध्ये edit बटन दिसणार नाही आणि जर तुमचा अर्ज नामंजूर झालेला असेल किंवा त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुमच्या अर्जामध्ये edit बटन दिसेल
जर तुमचा लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर झालेला असेल तर तुमच्यापुढे अर्ज पुढील प्रमाणे उघडेल ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: Approved असे लिहिलेले असेल.

ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका किंवा वेबसाईटवरून फॉर्म भरलेले असतील त्यांना नारीशक्ती दूत ॲप मध्ये लाभर्थी स्टेटस चेक करता येणार नाही.
Ladki bahin yojana offline list PDF
लाडकी बहिण योजनेची ऑफलाइन यादी आपण पीडीएफ च्या स्वरूपामध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतो किंवा प्रत्यक्षात चेक करू शकतो आणि त्यासाठीची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. Ladki bahin yojana list ऑफलाइन पद्धतीने चेक करता येत असल्यामुळे आपण आपल्या भागातील लाभार्थी महिलांची नावे बघू शकतो.
Ladki Bahin Yojana Yadi 2024 PDF
लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट जाहीर करण्यात आलेले आहे परंतु त्या वेबसाईट वरती अद्याप लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे लाडकी बहिणी योजनेची यादी चेक करण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप वापरा:
- सर्वात प्रथम google वरती सर्च करा beed municipal corporation, या उदाहरणातील beed च्या जागी तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून सर्च करा.
- आता तुमच्या जिल्ह्याची मुन्सिपल कॉर्पोरेशन ची वेबसाईट येईल ती उघडा
- मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटच्या पहिल्या पानावरती लाडकी बहीण योजना नावाचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा
- तुम्ही तुमच्या वार्डनुसार पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये आपले नाव आलेले आहे की नाही ते चेक करू शकता
अद्याप सर्वच जिल्ह्यांच्या वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही. जर तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या माध्यमातून अशी यादी देण्यात आलेली असेल तर तुम्ही ते चेक करू शकता किंवा ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करू शकता.
Ladki Bahin Yojana Form Status: Ladki Bahin Yojana list Maharashtra
जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या मोबाईल वरती पुढील प्रमाणे एसएमएस आलेला असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झालेला आहे यासाठी तुमच्या मोबाईल वरती पुढील फोटो प्रमाणे मेसेज आलेला आहे की नाही ते चेक करा.

तसेच जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल केलेला असेल तर तुम्ही तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन लाभार्थी यादी चेक करू शकता. महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये लाडकी बहिण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
ladki bahin maharashtra.gov.in 2024
महाराष्ट्र राज्यमार्फत लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन पोर्टल ladli behna maharashtra gov in सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमची लिस्ट चेक करू शकता आणि तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते बघू शकता.
यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे आणि त्यानंतर अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करायचे आहे तिथून तुम्ही नवीन पेज कडे पाठवले जातात जिथे एक फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून, कॅपच्या भरून लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या पुढे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प मेनू बार मध्ये दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि तिथून तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडला जाईल आणि तुम्ही तुमच्या अर्जाची परिस्थिती जाणून घेऊ शकाल. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झाला आहे हे तुम्हाला तिथे ladkibahin maharashtra.gov.in पोर्टल वरती बघायला मिळेल.
Ladki bahin yojana Form Rejected reason in Marathi
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही संबंधित फॉर्म परत edit करून भरू शकता. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट होण्यामागे बरीच कारणे असतात.
जर तुम्ही रेशन कार्डचा दोन्ही बाजूचा फोटो अपलोड केला नाही किंवा व्यवस्थित आधार कार्ड चे फोटो अपलोड केले नाहीत तसेच इतर माहिती योग्यरीत्या भरली नाही किंवा इतर डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो.
याचबरोबर बऱ्याच वेळेस सर्वर ला प्रॉब्लेम असल्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही अशा वेळेस आपण परत फॉर्म व्यवस्थित भरला असल्याची खात्री करणे गरजेचे ठरते.
जर तुम्ही हमीपत्र किंवा स्वयंघोषणापत्र व्यवस्थितरित्या भरलेले नसेल तरीदेखील तुम्हाला अर्ज मंजुरीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो.
लाडकी बहीण योजना स्वयंघोषणापत्र | लाडकी बहीण योजना हमीपत्र |
लाडकी बहिण योजना कागदपत्रे | लाडकी बहीण योजना फॉर्म |
लाभार्थी यादी | MMLBY |
महाराष्ट्र शासनांतर्गत लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी अत्यंत यशस्वीपणे आणि प्रभावीपणे करण्यात येत आहे आणि याकडे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असे आश्वासन देण्यात येत आहे.
तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव झाला की रिजेक्ट तसेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना काही समस्या येत असतील तर खाली कमेंटच्या माध्यमातून कळवा.
अर्ज भरताना शाळा सोडला चां ऐवजीं,नजर चुकीने दुसरे डॉक्युमेंट दिला गेला सबमिट झालं ,त्यामुळे फॉर्म रीजेक्ट झाला तर काय करावं
जर तुम्ही एखादे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले असेल आणि त्यामुळे अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि त्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्ज मध्ये जाऊन आपला फॉर्म एडिट करून परत व्यवस्थित डॉक्युमेंट भरा आणि अर्ज सबमिट करा
approval cha message ala ahe pun ajun paise ale nahi.